सिनेटवर आठ प्राचार्यांची बिनविरोध निवड ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

मुंबई -  सिनेट निवडणूकीच्या रणधुमाळीत सोमवारी अखेर उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. मध्यरात्रीपर्यंत नामनिर्देशन पत्राच्या छाननीचे काम सुरु होते. प्राचार्य गटात आठ प्राचार्यांची बिनविरोध निवड झाली असून, मंगळवारी याबाबतची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली गेली. 

या आठ प्राचार्यांच्या नावाच्या यादीत रुपारेलचे प्राचार्य डाॅ तुषार देसाई यांचेही नाव असल्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या अन्वये नुकतेच मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर केले. सात फेब्रुवारी रोजी सिनेटसाठी मतदान होणार असून दोन दिवसांनी निकाल जाहीर केला जाईल. त्यानुसार प्राचार्य प्रवर्ग, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक आणि वेगवेगळ्या अभ्यासमंळाच्या प्रवर्गावसाठी आलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशाची छाननी सोमवारी मध्य रात्रीपर्यंत सुरु होती. .या छाननीनंतर मंगळवारी ंमुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध केली जाईल. मंगळवारी यादीबाबत अाक्षेप नोंदवण्याचा अखेरचा दिवस असेल, अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून दिली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्यास मंडळावर 154, प्राचार्य प्रवर्गावर 28, व्यवस्थापन प्रतिनिधी प्रवर्गासाठी 20आणि वि्द्यापीठ अध्यापक प्रवर्गासाठी 24 नामनिर्देशित अर्ज आले आहेत. 

Web Title: mumbai news mumbai university Senate election