यूजीसीच्या मान्यतेअभावी दोन अभ्यासक्रम मागे

नेत्वा धुरी
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) नुकतेच बॅफ, बी. कॉम (अकाऊंटिंग ॲण्ड फायनान्स) - प्रथम वर्ष आणि मोड्युलर प्रोग्राम्स इन इंडियन म्युझिक असे दोन नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र त्या अभ्यासक्रमांना विद्यापीठ मान्यता आयोगाची (यूजीसी) मंजुरी नसल्याने ते मागे घेण्याचे निर्देश विद्यापीठ व्यवस्थापनाने नुकतेच आयडॉलला दिले. 

यूजीसीच्या परवानगीशिवाय सुरू झालेल्या बॅफ, बी. कॉम (अकाऊंटिंग ॲण्ड फायनान्स) - प्रथम वर्ष आणि मोड्युलर प्रोग्राम्स इन इंडियन म्युझिक या दोन अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असते. त्यामुळे ऑनस्क्रीन असेसमेंट प्रक्रियेतील गोंधळानंतर मुंबई विद्यापीठात नवा वाद सुरू होण्याची शक्‍यता होती. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. अभ्यासक्रमांची माहिती देणारे पत्रक आयडॉलने ६ सप्टेंबरला प्रसिद्ध केले होते. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाली होती. अभ्यासक्रमांचा प्रस्तावही नुकत्याच झालेल्या बैठकीत मांडण्यात आला होता. त्या संदर्भात झालेल्या वादावरूनच कार्यकाळ संपूनही पदावर असलेल्या आयडॉलच्या पूर्व संचालिका डॉ. अंबुजा साळगावर यांच्या जागी नवे संचालक नेमण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: mumbai news mumbai university UGC