मुंबई विद्यापीठातील केवळ दोन परीक्षांचे निकाल बाकी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठातील सर्व निकाल लवकरच पूर्ण होतील. जवळपास सव्वा महिन्यापासून अहोरात्र काम करणाऱ्या नव्या टीमने आता केवळ दोन परीक्षांचे निकाल बाकी असल्याची माहिती दिली. "आयडॉल'च्या बी.कॉम. आणि रेग्युलरच्या एम.कॉम. सत्र-4 चा निकालच बाकी आहे, असे मुंबई विद्यापीठातील "परीक्षा भवना'चे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले. मंगळवारी रात्रीपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, अशी माहितीही डॉ. घाटुळे यांनी दिली. 

आठवडाभरापूर्वी विद्यापीठाच्या नव्या टीमने पत्रकार परिषदेत उत्तरपत्रिका तपासणीतील सत्यस्थिती सांगितली होती. त्या वेळी 28 हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली होती. त्यापैकी नऊ हजार 700 विद्यार्थ्यांचे निकाल मंगळवारी सायंकाळपर्यंत राखीव होते. हे निकाल कधी लागतील, याबाबत मात्र काहीच स्पष्टता नसल्याची कबुलीही त्यांनी दिली. 

मंगळवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार, आणखी चार हजार 200 उत्तरपत्रिका तपासण्याचे काम बाकी होते. आठवड्याच्या शेवटी प्राध्यापकांची संख्या खूपच कमी दिसून आली. केवळ 75 प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासत होते. आठवडाभरापूर्वी आठ निकाल प्रलंबित होते; मात्र सात दिवसांत एम.कॉम. रेग्युलरचे आणि एम. कॉम. आयडॉलचे मिळून सहा विषयांच्या परीक्षांचे निकाल लावण्यात आले.

Web Title: mumbai news mumbai univesity result