पालिकेच्या बॅंकांमध्ये हजार कोटींच्या ठेवी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

मुंबई - पालिकेकडून विविध बॅंकांमध्ये कंत्राटदारांच्या परताव्याच्या, कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या रकमा, वार्षिक अर्थसंकल्पात न वापरलेला निधी विविध बॅंकांमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवला जातो.

मुंबई - पालिकेकडून विविध बॅंकांमध्ये कंत्राटदारांच्या परताव्याच्या, कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या रकमा, वार्षिक अर्थसंकल्पात न वापरलेला निधी विविध बॅंकांमध्ये मुदत ठेव म्हणून ठेवला जातो.

महापालिकेकडून विविध बॅंकांमध्ये या ठेवण्यात आलेल्या ठेवींचा आकडा दरमहा वाढत असून, ही रक्कम 67 हजार 741 कोटी रुपयांच्या घरात गेल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत पालिकेचा अर्थसंकल्प फुगत चालला आहे. हा अर्थसंकल्प 37 हजार कोटींपर्यंत गेला होता. गेल्या वर्षी सन 2017-18 चा वास्तववादी 25 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र पालिकेच्या अर्थसंकल्पातील रकमा खर्चच होत नसल्याने अर्थसंकल्पाचा आकडा कमी होऊनही बॅंकांमध्ये गुंतवल्या जाणाऱ्या रकमेत वाढच होत आली आहे. जून 2017 पर्यंत विविध बॅंकांमध्ये पालिकेच्या 64 हजार 482.64 कोटींच्या ठेवी होत्या.

Web Title: mumbai news municipal bank deposit