बाहेरच्यांसाठी मुंबई पालिका रुग्णालये महाग?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

मुंबई - मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील उपचार मुंबईबाहेरील रुग्णांसाठी ३० टक्‍क्‍यांनी महाग होणार आहेत. मुंबईतील नागरिकांसाठी ही वाढ २० टक्‍क्‍यांनी करण्यात आली आहे; तर ज्येष्ठ नागरिकांना यापुढे मोफत उपचार मिळणार आहेत.

पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत शुल्कवाढीला मंजुरी मिळाली आहे. महासभेच्या मंजुरीनंतर ही शुल्कवाढ लागू होईल. दरम्यान, मुंबई आणि मुंबई बाहेरील रुग्णांसाठीच्या शुल्क वाढीतील भेदभाव वादग्रस्त ठरू शकतो. 

पालिका रुग्णालय हे प्रामुख्याने मुंबईतील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी बांधण्यात आली आहेत; मात्र त्यात मोठ्या प्रमाणात मुंबईबाहेरील रुग्णही उपचार घेतात. पालिकेच्या केईएम, नायर आणि लोकमान्य टिळक या तीन रुग्णालयांवर पालिका वर्षाला ६०० ते ७०० कोटी खर्च करते. त्यापैकी १० टक्केही उत्पन्न पालिकेला मिळत नाहीत. अशीच स्थिती इतर रुग्णालयांची आहे. २००२ मध्ये शुल्कवाढ करण्यात आली होती. प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी रुग्णसेवेच्या शुल्कात ७५ ते १०० टक्के दरवाढीचा प्रस्ताव मांडला होता. मुंबईबाहेरील नागरिकांना अतिरिक्त २० टक्के शुल्काची शिफारस केली होती; मात्र आज मुंबईतील नागरिकांना २० टक्के आणि मुंबईबाहेरील नागरिकांना ३० टक्के शुल्कवाढ करण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेणार आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांत आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या शुल्कात उपचार मिळत होते; मात्र यापुढे मोफत उपचार देण्याच्या अटीवरच गटनेत्यांनी आज या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

पालिका प्रशासनाने महापालिका निवडणुकीपूर्वी जून २०१६ मध्ये शुल्कवाढीचा प्रस्ताव मांडला होता. त्या वेळी निवडणुकीच्या तोंडावर शुल्कवाढ केली असती, तर त्याचा राजकीय फटका बसला असता. त्यामुळे तेव्हा या प्रस्तावाला विरोध करण्यात आला होता.

Web Title: mumbai news municipal hospital