बालवाडीचे दोन्ही वर्ग एकाच वेळी घ्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

मुंबई - महापालिकेच्या 28 शाळांतून 96 शिक्षक गेल्यानंतर पालिकेच्या शिक्षकांवरच बालवाडीचे वर्ग चालवण्याची वेळ आली आहे. इंग्रजी माध्यमातील ज्युनियर आणि सिनियरचे वर्ग एकाच वेळी घेऊन दिवस ढकलण्याचा आदेश मुख्याध्यापकांनी शिक्षकांना दिला आहे. 

सीएसीआर फंडाच्या माध्यमातून पालिका शाळेतील इंग्रजी माध्यमाच्या 28 शाळा सुरू होत्या. या शाळांना नांदी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने 96 शिक्षक दिले. मात्र शिक्षकांच्या निकृष्ट कामगिरीमुळे संस्थेला निधी मिळणे कठीण झाल्याची तक्रार पालिकेने नियुक्त केलेल्या शिक्षकांनी केली. या शिक्षकांकडे आवश्‍यक शैक्षणिक पात्रता नव्हती, वर्गात शिकवण्याची कला नसल्याने देणगीदारही निघून जात होते, अशी माहिती पालिकेने नियुक्त केलेल्या शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली. 

अद्याप काही शाळांमध्ये ज्युनियर केजीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ती सांभाळत दोन्ही इयत्तांना शिकवण्याची कसरत शिक्षकांना करावी लागणार आहे. ज्युनियर केजीला येणारी मुले कित्येकदा पालकांच्या विरहामुळे महिनाभर रडतच राहतात, एकमेकांना मारतात. काही दुर्दैवी घटना घडली तरीही शिक्षकांना जबाबदार धरले जाते. या सगळ्यांना सामोरे जाणारे शिक्षक नऊ वर्षांपासून केवळ पाच हजार रुपयांच्या पगारावरच काम करत आहेत, अशी खंतही व्यक्त केली जात आहे.

Web Title: mumbai news municipal school nursery class

टॅग्स