पालिका रुग्णालयात  आरोग्य सुविधांचा बोजवारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

नवी मुंबई - पालिका रुग्णालयात वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत आहेत. याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे. वाशी येथील पालिका रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. 

नवी मुंबई - पालिका रुग्णालयात वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत आहेत. याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे. वाशी येथील पालिका रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. 

शहरात वैद्यकीय सेवांचे दर खूपच वाढले आहेत. परिणामी, पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे. पालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात रुग्णांना मोफत उपचाराबरोबर काही औषधेही मोफत दिली जातात; मात्र दोन महिन्यांपासून रुग्णांना नेहमी मिळणारी औषधे मिळेनाशी झाली आहेत. औषधांचा साठा संपला आहे. बाहेरून औषधे घ्या, असे उत्तर रुग्णांना दिली जातात. याचबरोबर रुग्णालयात वेगवेगळ्या उपचारांसाठी अनेक कक्ष आहेत. त्या कक्षात उपचारासाठी लागणारी उपकरणेही नसल्याचे समोर आले आहे. 

पालिका रुग्णालयात येणाऱ्या बहुतांशी रुग्णांची आर्थिक स्थिती नाजूक असते. वैद्यकीय उपचार स्वस्तात व्हावे, यासाठी पालिका रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या अधिक असते; मात्र रुग्णालयात औषधे आणि उपकरणांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांना पालिकेचे उपचार महागडे वाटत आहेत. पालिकेच्या वैद्यकीय विभागाने त्वरित सेवा-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहेत.

रुग्णालयात पुरेशी औषधे असतात. जी औषधे संपली आहेत, त्याचा पर्याय म्हणून दुसरी औषधे पुरवली जातात. औषध घेण्यासाठी निविदा प्रक्रिया लांबल्यामुळे वेळेवर औषधे मिळत नाहीत. औषधांच्या पुरवठ्याबाबत आढावा घेऊन उपलब्ध नसलेली औषधी मागविली जाईल.
- दीपक परोपकारी, वैद्यकीय अधिकारी

Web Title: mumbai news municipality hospital medicine