मटणासाठी पैसे न दिल्याने तरुणाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

मुंबई - बकरी ईदला घेतलेल्या मटणाचे 300 रुपये परत दिले नाहीत या कारणावरून वाद झाल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून करणारा मुलगा अल्पवयीन आहे. त्याला वाशी रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

इमरान कुरैशी (वय 19) असे मृताचे नाव आहे. लहानग्याने इमरानची हत्या करुन त्याचा मृतदेह वाशी आणि गोवंडी रेल्वे स्थानकाजवळ टाकून दिला होता. पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली होती. पण इमरानच्या मानेवर असलेल्या वारामुळे पोलिसांना सुगावा लागला. पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: mumbai news murder