वॉचमनकडूनच पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

कर्जत - शहरातील मानस कॉम्प्लेक्‍सच्या वॉचमननेच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे. पाच दिवसांपासून पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिल्यानंतर, आज वॉचमनने किरकोळ भांडणातून खून केल्याचे स्पष्ट केले.

कर्जत - शहरातील मानस कॉम्प्लेक्‍सच्या वॉचमननेच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे. पाच दिवसांपासून पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिल्यानंतर, आज वॉचमनने किरकोळ भांडणातून खून केल्याचे स्पष्ट केले.

लक्ष्मी धुरुपसिंग कुमाल (वय २९) हिचा मृतदेह १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सापडला होता. आपण बॅंकेत पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर पत्नीचा खून झाल्याचा दावा धुरुपसिंग कुमाल याने केला होता; मात्र पोलिसांना संशयास्पद स्थितीनंतर धुरुपसिंगवरच संशय होता. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिस निरीक्षक अशोक ठाकूर, सहायक निरीक्षक अजित शिंदे, उपनिरीक्षक आर. आर. आडगळे, सहायक उपनिरीक्षक एस. एस. राजमाने, नितीन अहिरे आदींच्या पथकाने तपास सुरू केला होता.

घरातील साहित्य ठेवलेली लोखंडी मांडणी डोक्‍यावर पडल्यामुळे लक्ष्मी हिचा मृत्यू झाला असल्याचा दावा धुरुपसिंगने केला होता; मात्र वरिष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे यांनी शहरातील सीसी टीव्ही फुटेज जमा करून अभ्यास केला; तसेच सुमारे १००हून अधिक नागरिकांकडे चौकशी केली. त्यानंतर पुरावे दाखविल्यावर धुरुपसिंगने खुनाची कबुली दिली.

Web Title: mumbai news murder

टॅग्स