मित्राचा खून करणाऱ्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

मुंबई - मित्राच्या पत्नीच्या सांगण्यावरून त्याचा खून करणाऱ्यास खेरवाडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला बुधवारी (ता.21) न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

मुंबई - मित्राच्या पत्नीच्या सांगण्यावरून त्याचा खून करणाऱ्यास खेरवाडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला बुधवारी (ता.21) न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

खेरवाडी परिसरात सचिन चारी (40) हा पत्नीसोबत राहत होता. त्याच परिसरात चेतनही राहत होता. चेतनचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय सचिनला होता. त्यावरून त्या दाम्पत्यात वाद होत. त्यामुळे कंटाळलेल्या सचिनच्या पत्नीने चेतनला त्याच्या खुनाची सुपारी दिली. 27 मे रोजी सचिन आणि चेतन एकत्र दारू प्यायले. त्या वेळी चेतनने सचिनचा खून केला. दुसऱ्या दिवशी गळा चिरलेल्या अवस्थेतील सचिनचा मृतदेह पोलिसांना आढळला. तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्या पत्नीला अटक केली. ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. चेतनला पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली होती. मंगळवारी (ता.20) त्याला नाशिक येथून अटक करण्यात आली. 

Web Title: mumbai news murder case

टॅग्स