मित्राची हत्या करणारा बिहारमधून अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

कोपरखैरणे - पत्नीची छेड काढणाऱ्या मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बिहार येथून अटक केली. एहसान खान असे त्याचे नाव आहे. एहसान खान याचा एप्रिल २०१७ मध्ये विवाह झाला होता. त्याची पत्नी ही बिहार येथे तिच्या माहेरीच राहत होती. एहसान ईदनिमित्त सासूरवाडीला गेला होता. तेथे मित्र जसीम खान याला सोबत नेले होते. तेव्हा एहसान याच्या अनुपस्थितीत जसीम याने त्याच्या पत्नीची छेड काढली होती. याबाबत पत्नीने एहसान याला सांगितल्यानंतर तो जसीम याला नवी मुंबईतील महापे येथे टेलरिंग कामासाठी घेऊन आला. ९ जुलैला ते जेवून दुकानात झोपले.

कोपरखैरणे - पत्नीची छेड काढणाऱ्या मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बिहार येथून अटक केली. एहसान खान असे त्याचे नाव आहे. एहसान खान याचा एप्रिल २०१७ मध्ये विवाह झाला होता. त्याची पत्नी ही बिहार येथे तिच्या माहेरीच राहत होती. एहसान ईदनिमित्त सासूरवाडीला गेला होता. तेथे मित्र जसीम खान याला सोबत नेले होते. तेव्हा एहसान याच्या अनुपस्थितीत जसीम याने त्याच्या पत्नीची छेड काढली होती. याबाबत पत्नीने एहसान याला सांगितल्यानंतर तो जसीम याला नवी मुंबईतील महापे येथे टेलरिंग कामासाठी घेऊन आला. ९ जुलैला ते जेवून दुकानात झोपले. एहसान याने मध्यरात्री जसीम याचा वायरने गळा आवळून खून केला व तो बिहारमध्ये पळून गेला. नवी मुंबई पोलिसांनी नुकतेच त्याला बिहार येथून अटक केल्याची माहिती सहआयुक्त प्रशांत बुरुडे यांनी दिली.

Web Title: mumbai news murder crime