मित्राने केली मित्राची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

मुंबई - पैशांच्या वादातून मित्राची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पंकज गिरिजाशंकर मिश्रा याला अटक केली आहे.

मुंबई - पैशांच्या वादातून मित्राची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पंकज गिरिजाशंकर मिश्रा याला अटक केली आहे.

गिरिजाशंकर याने सोमवारी (ता. 6) रात्री चेंबूर येथे अमृतकुमार राजगौड या आपल्या मित्राची हत्या केली. चेंबूर इंदिरानगर परिसरात अमृतकुमार आणि पंकज भाड्याच्या घरात राहत होते. काही दिवसांपूर्वी अमृतकुमारने पंकजकडून उसने पैसे घेतले होते. तो ते परत करण्याचे नाव घेत नव्हता. सोमवारी रात्री दारू प्यायल्यानंतर अमृतकुमार आणि पंकजमध्ये याबाबत वाद झाला. तो विकोपाला गेला. त्या वेळी पंकजने फेट्याच्या कापडाने अमृतकुमारचा गळा आवळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Web Title: mumbai news murder by friend

टॅग्स