मुंबईत पेपरफुटी प्रकरणी 10 जण ताब्यात

मंगेश सौंदाळकर
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

एका विद्यार्थिनीच्या मोबाईलवर या अभ्यासक्रमाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आढळली होती. 

मुंबई :  अंधेरी (पश्चिम) येथील एमव्हीएम कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (BMS) या अभ्यासक्रमाचा पेपर फुटल्याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत दहाजणांना ताब्यात घेतले आहे. 

ही घटना गुरुवारी घडली होती. एका विद्यार्थिनीच्या मोबाईलवर या अभ्यासक्रमाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आढळली होती. या प्रकरणी विद्यापीठ आणि महाविद्यालय प्रशासनाने अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. 

रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासाला सुरवात केली. पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे परिमंडळ 9 चे उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news mvm college paper leak, ten detained