नानावटी रुग्णालयाच्या विश्‍वस्तांचे उपटले कान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

मुंबई - गरिबांवर विनामूल्य उपचार होत नसल्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे स्पष्टीकरण देण्याऐवजी वृत्तपत्रांकडे खुलासा करण्याची विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयाची कृती अवमानकारक आहे, असा ठपका आयुक्तांनी ठेवला आहे. रुग्णालयाच्या विश्‍वस्तांनी स्वतःच्या खिशातून पाच लाख मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावेत, असा आदेश आयुक्तांनी दिला आहे.

धर्मादाय रुग्णालयांना 20 टक्के खाटांवर गरीब रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार देणे बंधनकारक आहे. मात्र याचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आल्याने धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी स्वतः रुग्ण म्हणून तिथे भेट दिली होती. नानावटी रुग्णालयात या तरतुदीचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने डिगे यांनी याबाबत रुग्णालयाकडून खुलासा मागवला. मात्र रुग्णालयाच्या विश्‍वस्तांनी त्याऐवजी वृत्तपत्रांकडे या भेटीबाबत खुलासा पाठवून आपली बाजू मांडली. तो खुलासा "सकाळ' वगळता अन्य वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्याने धर्मादाय आयुक्तपदाचा अवमान झाल्याचा ठपका डिगे यांनी ठेवला.
विश्‍वस्तांनी वृत्तपत्रांना खुलासा देऊन आयुक्तांच्या भेटीबाबत संभ्रम निर्माण केला. त्यामुळे आयुक्तपदाचा अवमान झाल्याबद्दल कारवाई का करू नये, अशी नोटीस विश्‍वस्तांना बजावण्यात आली. विश्‍वस्तांनी बिनशर्त माफी मागितली. प्रसारमाध्यमांनीच आपले म्हणणे मागितल्याने रुग्णालयाची प्रतिमा जपण्यासाठी नकळत हा खुलासा केला, असे म्हणणे त्यांनी मांडले. मात्र हा दावा आयुक्तांनी फेटाळला.

Web Title: mumbai news nanavati hospital trustee