हम भी सबको देख लेंगे - नारायण राणे

सरकारनामा
शुक्रवार, 26 मे 2017

विरोधकांनी माझ्यावर समजून उमजून खेळलेली ही चाल आहे. माझ्या नावाचा गैरवापर करून कुरघोडी करायच्या, हा जणू विरोधकांना जडलेला छंदच आहे . 'पर हम भी कच्चे खिलाडी  नही सबको देख लेंगे'...

मुबंई : काँग्रेसनेते नारायण राणे सतत चर्चेत असतात . काढे स्वतःच्या वक्तव्याने तर कधी आक्रमक कृतीने ! पण कधी कधी त्यांनी काही केलेले नसले तरी ते  चर्चेत येत आहेत . नारायण राणेंच्या मते त्यांचे "हितचिंतक" अनेकदा त्यांचे नाव चर्चेत राहावे म्हणून असले उद्योग करतात . 

काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या ट्विटर ब्लॉगवर नारायण राणे यांच्या नावाने असे  ट्विट केले गेले की, "खडसेंवर आरोप करणाऱ्या अंजली दमानिया आज ना.गिरीष महाजनांच्या दाऊद कुटुंबातील लग्नाच्या हजेरीवर गप्प का?   आणि त्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली . नारायण राणेंनी दमानिया यांना ट्विट केल्याचा प्रचार व्हाट्स ऍप वर होत होता. 

 याबद्दल 'सरकारनामा'ने त्यांना विचारले असता ते म्हणाले, अंजली दमानिया यांच्या ट्विटर ब्लॉगवर माझ्या नावाने लिहिलेली माहिती मी लिहिली नसुन माझ्या नावाचा गैरवापर करून कोणीतरी ते ट्विट केले आहे. 

"विरोधकांनी माझ्यावर समजून उमजून खेळलेली ही चाल आहे. माझ्या नावाचा गैरवापर करून कुरघोडी करायच्या, हा जणू विरोधकांना जडलेला छंदच आहे . 'पर हम भी कच्चे खिलाडी  नहीसबको देख लेंगे." अशा शब्दांत आपल्या भावना राणे यांनी व्यक्त केल्या.

अंजली दमानिया यांच्या ट्विटर ब्लॉगवर काल लिहिलेली माहिती फेक आहे. मी माझ्या अधिकृत ट्विटर ब्लॉगवरून ही ट्विट केलेले नाही. माझ्या नावे कॉम्प्युटर ग्राफिक्सचा दुरुपयोग करून हे चित्र निर्माण केलेले आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेऊन सायबर क्राईमच्या अंतर्गत तक्रार नोंदविली असुन आधुनिक स्पाय सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाच्या आधारे संबंधित चित्राचा स्त्रोत शोधून कारवाई केली जाईल. असेही राणे यांनी सांगितले.

Web Title: Mumbai News: Narayan Rane criticizes opponents