नॅशनल पार्कमधील बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नेत्रा या मादी बिबट्याचा गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. उद्यानातील लेपर्ड रेस्क्‍यू केंद्रात आता आठ नर आणि दोन माद्या आहेत.

मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नेत्रा या मादी बिबट्याचा गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. उद्यानातील लेपर्ड रेस्क्‍यू केंद्रात आता आठ नर आणि दोन माद्या आहेत.

नगरहून सहा वर्षांच्या नेत्राला 2007 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले होते. सहा महिन्यांपासून तिची तब्येत खालावत होती. त्यामुळे तिच्या हालचालीही कमी झाल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये तिची प्रकृती अधिक खालावली होती. त्या वेळी तिच्यावर उपचार करण्यात आले होते.

दरम्यानच्या काळात तिचे अवयव निकामी होत गेले. तिने गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. तिच्या छातीत जंतूसंसर्ग झाला होता; तसेच गर्भाशयालाही गाठी होत्या, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने दिली.

Web Title: mumbai news national park leopard death