निसर्गोद्यानासाठी आदित्य ठाकरे सरसावले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई - धारावी पुनर्विकास योजनेतील पाचव्या सेक्‍टरमध्ये धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचा समावेश केला असल्याने या उद्यानाची हानी होण्याची भीती निसर्गप्रेमी व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही हे उद्यान वाचवण्यासाठी पुढाकार घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. शहराच्या दक्षिण भागातील 41 एकरवर वसलेल्या महाराष्ट्र निसर्ग उद्यान बिल्डरांच्या घशात घालण्याची तयारी सुरू झाली आहे, असा आरोप होत आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) धारावी पुनर्विकास योजनेची जाहिरात प्रसिद्ध होताच पर्यावरणप्रेमी संतापले आहेत.
Web Title: mumbai news nature park aaditya thackeray