बेलापूर आयकर कॉलनीतील स्लॅब कोसळल्याने तीन जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

हा स्लॅब कोसळण्याची नेमकी कारणे काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नवी मुंबई : येथील बेलापूरच्या आयकर कॉलनीतील सांदीपनी सोसायटीमधील एका सदनिकेचा स्लॅब कोसळला. आज पहाटे ही घटना घडली. 

सांदीपनी सोसायटीतील या घरातील सर्वजण झोपेत असताना ही घटना घडली. स्लॅब कोसळल्याने त्यामध्ये तीनजण जखमी झाले आहेत. तुषार पांचाळ (26), अभिषेक पांचाळ (29) आणि अर्चना पांचाळ (52) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींच्या पायाला आणि तोंडाला जखम झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हा स्लॅब कोसळण्याची नेमकी कारणे काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, अलीकडेच काही दिवसांपूर्वी जास्त जागा मिळविण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या बांधकामात बदल करून अतिरिक्त बांधकाम केल्याने एक इमारत कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news navi mumbai belapur building collapsed