नवनीत कौर यांच्या अडचणींत वाढ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मुंबई - आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करताना बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी नव्याने कागदपत्रांची छाननी करा व एका आठवड्यात याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देत वांद्रे येथील दक्षता पथकाने दक्षता अधिकाऱ्यांना देत पुढील सुनावणी 18 ऑक्‍टोबरपर्यंत तहकूब केली आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना, नवनीत कौर राणा यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा दावा करत, हे प्रमाणपत्र रद्द करून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी जयंत वंजारी आणि राजू मानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने 28 जूनला दिलेल्या आदेशानुसार, तीन महिन्यांच्या आत दोन्ही पक्षकारांनी सादर केलेली कागदपत्रांची छाननी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान, जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नवनीत राणा यांच्या वडिलांचे वांद्रे येथील कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले होते. तसेच जी शाळा अस्तित्वातच नाही त्या शाळा सोडल्याचा दाखला कसा दिला जातो? या आधारावर जात प्रमाणपत्र ग्राह्य धरता येणार नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. नवनीत कौर यांनी पंजाबच्या रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. त्याबाबतही चौकशी करून तीन महिन्यांत अहवाल देऊन निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने यापूर्वी जात वैधता समितीला दिले आहे.

Web Title: mumbai news navneet kaur rana loksabha election form problem