मेलमधून पडलेल्या चिमुकलीचा जीव वाचला!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

शहापूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे यांनी वेळीच धावपळ केल्यामुळे मेलमधून पडलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीचे प्राण वाचले आहेत. या माणुसकीबद्दल विद्या वेखंडे यांचे कौतुक केले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी बुधवारी शहापूर तालुक्‍यातील कानविंदे येथील मतदान केंद्रावर विद्या वेखंडे गेल्या होत्या. त्या सायंकाळी साडेचारच्या सुमारास परतत होत्या. त्या वेळी कमी वेगाने जात असलेल्या मेल गाडीतून एक लहान मुलगी पडताना दिसली. त्यांनी त्वरित आपली गाडी थांबवून मुलीला उचलले. या मुलीच्या डोक्‍यातून रक्त येत होते. विद्या वेखंडे रुग्णालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या वेळी रेल्वेमार्गातून एक कुटुंब रडत-रडत घाईगर्दीत येताना दिसले. या कुटुंबाला मुलगी पाहून दिलासा मिळाला. संपूर्ण कुटुंबाला घेऊन विद्या वेखंडे यांनी आपल्या गाडीने शहापूर येथील सरकारी दवाखाना गाठला. त्यानंतर या मुलीवर उपचार सुरू करण्यात आल्यामुळे तिचे प्राण बचावले आहेत. वेळीच धावपळ केल्याने जीवदान मिळाल्याबद्दल विद्या वेखंडे यांचे कौतुक केले जात आहे.

Web Title: mumbai news NCP vidya vekhande