'एनसीव्हीटी'चा निकाल जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई - 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) या संस्थेने घेतलेल्या परीक्षेचा निकाल त्वरित जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यार्थी संघटनेने मंगळवारी (ता. 8) केली. "आयटीआय'ची परीक्षा 18 एप्रिलला झाली; परंतु तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही निकाल न लागल्याने संघटनेने संताप व्यक्त केला. आयटीआय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर "एनसीव्हीटी'च्या वतीने देशभरातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय पातळीवर परीक्षा घेतली जाते. "एनसीव्हीटी'ने निकाल जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यात अडचणी येत असल्याची तक्रार राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रसचे मुंबई जिल्हाध्यक्ष ऍड. अमोल मातेले यांनी केली.
Web Title: mumbai news ncvt result declare demand by ncp