नेरळ-माथेरान मिनी ट्रेन उद्यापासून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नेरळ - रुळावरून डबे घसरल्यामुळे 20 महिन्यांपासून बंद पडलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन 26 जानेवारीपासून (शुक्रवार) पुन्हा सुरू होत आहे. सुमारे पावणेदोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पर्यटकांना पुन्हा नेरळहून ट्रेनची सफर अनुभवता येणार आहे. 

मिनी ट्रेनची वाहतूक 9 मे 2016 पासून अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर दीड वर्षाने 30 ऑक्‍टोबर रोजी माथेरान ते अमन लॉज अशी शटल सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर नेरळ-माथेरान सेवेची प्रतीक्षा केली जात होती. अखेर आता शुक्रवारपासून सेवा सुरू होत आहे. 

नेरळ-माथेरान 21 किलोमीटर नॅरोगेज मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी दरीलगत संरक्षक भिंती उभारण्यात आल्या. पावसाळ्यात वाहून जाणारी माती थांबविण्यासाठी लोखंडी तारांमध्ये दगड टाकून गॅबियन बांधण्यात आले आहेत. दरम्यान, मिनी ट्रेन पुन्हा सुरू करण्यासाठी आपण सातत्याने आवाज उठविला होता. आता सकाळी 8-9 या वेळात नेरळहून प्रवासी ट्रेन सुटण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. 

तूर्त एक फेरी 
नेरळ-माथेरान मार्गावर 4 जानेवारी रोजी चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे 26 जानेवारीपासून मिनी ट्रेनची एक फेरी चालविण्यात येईल. उन्हाळी पर्यटन हंगामापूर्वी मिनी ट्रेनची सेवा पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू करण्याचे प्रयत्न राहतील. 
- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे. 

Web Title: mumbai news Neural-Matheran Mini Train