नवीन कुलगुरू नेमण्यासाठी 'इस्रो'च्या शास्त्रज्ञाची मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाचे नवीन कुलगुरू नेमण्यासाठी शोधसमिती नेमण्यात आली आहे. बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हे जाहीर केले.

मुंबई - मुंबई विद्यापीठाचे नवीन कुलगुरू नेमण्यासाठी शोधसमिती नेमण्यात आली आहे. बुधवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी हे जाहीर केले.

डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली ही शोधसमिती काम करणार आहे. डॉ. कस्तुरीरंगन हे भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) या संस्थेत 1994 ते 2003 या काळात शास्त्रज्ञ होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) ते माजी कुलपती होते. कर्नाटक नॉलेज कमिशनचे सचिवपद त्यांनी भूषवले आहे. बंगळूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडीज या संस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. 2003 ते 2009 या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते. नियोजन आयोगावरही सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.

कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना मंगळवारी राज्यपालांनी निकालातील दिरंगाईचा ठपका ठेवून निलंबित केले. त्यानंतर या पदावर कोण विराजमान होईल, याबाबत चर्चा सुरू झाली. मुंबई विद्यापीठाची प्रशासकीय माहिती असलेल्या व्यक्तीलाच या पदावर नेमावे, अशी मागणी विद्यापीठ वर्तुळातून केली जात आहे.

Web Title: mumbai news new isro scientist help for vice chancellor selection