कमी उंचीची मूर्ती आणि  पर्यावरणपूरक सजावट हवी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

नवी मुंबई - कमी उंचीच्या मूर्ती आणि पर्यावरणपूरक सजावटीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अधिक भर द्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी केले. २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी महापालिका अधिकारी, नवी मुंबई पोलिस आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी कमी उंचीच्या मूर्ती व पर्यावरणपूरक सजावटीला पालिका प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले. 

गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. त्याची पूर्वतयारी सरकारी यंत्रणांनी सुरू केली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आयुक्त रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत अलीकडेच बैठक झाली. गणेशोत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कमीत कमी उंचीच्या मूर्तींवर भर द्यावा आणि पर्यावरणपूरक मूर्तीसह सजावट करावी. अशा उपक्रमांना महापालिका प्रोत्साहन देईल, असे मत त्यांनी बैठकीत व्यक्त केले. उत्सव आयोजनासाठी आवश्‍यक परवानगी प्रक्रियेत अधिक सुलभता यावी, यासाठी व सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांना एकाच ठिकाणी परवानग्या मिळाव्यात, यासाठी एक खिडकी संकल्पना राबवण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. यासाठी महापालिकेच्या आठ विभाग कार्यालयांमध्ये विशेष कक्ष स्थापन केले जाणार आहेत. तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. स्टेज व मंडपासाठी पोलिस व वाहतूक पोलिसांनी दिलेला ना हरकत दाखला सादर केल्यानंतर महापालिकेकडून अंतिम परवानगी मिळणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून मंडप व कमानींसाठी रस्त्यांवर खोदकाम न करता रेतीचे ड्रम किंवा डब्यांचा वापर करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत. रस्त्यांवरील कमानी २२ फुटांपेक्षा कमी नसाव्यात, असे बैठकीत ठरले आहे.

Web Title: mumbai news news mumbai ganeshotsav