भारतातर्फे ‘न्यूटन’ ऑस्करच्या शर्यतीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

मुंबई - अमित मसुरकर दिग्दर्शित ‘न्यूटन’ या चित्रपटाची निवड २०१८ मध्ये होणाऱ्या अत्यंत मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी झाली आहे. भारतातर्फे हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत असेल. ‘परकी भाषेतील उत्कृष्ट चित्रपट विभागातून हा चित्रपट शर्यतीत उतरेल. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या समितीने शुक्रवारी ही घोषणा केली. 

ही माहिती देताना फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव सुप्राण सेन म्हणाले, ‘ऑस्करला चित्रपट पाठवला जावा म्हणून एकूण २६ प्रवेश अर्ज आले होते. त्यापैकी सर्वांनीच एकमताने ‘न्यूटन’ची निवड केली. या चित्रपटात न्यूटनकुमारची भूमिका राजकुमार राव याने केली आहे. 

रघुवीर यादव, पंकज त्रिपाठी, अंजली पाटील यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. याबद्दल बोलताना मसुरकर म्हणाले, ‘‘चित्रपटाची निवड झाल्याने मला खूप आनंद आणि समाधान वाटते आहे. या घोषणेमुळे हा चित्रपट लोक चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहातील असे मला वाटते. ४ मार्च २०१८ मध्ये होणाऱ्या ९० व्या ॲकॅडमी ॲवॉर्डसाठी हा चित्रपट आता पात्र ठरला आहे. 

Web Title: mumbai news Newton movie oscar