जलमार्गाचे जाळे पसरविणार - गडकरी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

भाईंदर - देशात यापूर्वीच्या सरकारने 70 वर्षांत 5 हजार किलोमीटरचे रस्ते केले, तर आम्ही साडेतीन वर्षांत 22 हजार किलोमीटर रस्त्यांचे जाळे पसरविले आहे. यापुढील काळात रस्त्यांसह जलमार्ग विस्तारीकरणाला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मीरा रोड येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकारणतर्फे घेण्यात आलेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केले. 

येत्या दोन वर्षांत विविध ठिकाणी जेट्टी बांधण्यासह दोन हजार शिप लेन सुरू करणार असल्याची घोषणाही गडकरी यांनी केली. ते म्हणाले, की मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहतुकीचा ताण पाहता जेएनपीटीहून येणारा माल जलमार्गाद्वारे वसईच्या भागात येईल आणि त्यानंतर पुढे रवाना होईल, अशी योजना आखली आहे. मॅथेनॉलच्या वापरावर भर देण्यासह इलेक्‍ट्रिक बसला प्राधान्य देण्याचा विचार असून, दिल्ली ते मुंबई असा "इलेक्‍ट्रिक हायवे'चा मार्ग बनविण्याचा विचार सुरू आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले, की नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला रस्त्यांचे जाळे दिले. देशात त्यांनी सुरू केलेल्या विकासामुळे समृद्धीचे वारे वाहत आहेत. मुंबई आणि परिसर देशाच्या प्रगतीत प्रमुख स्थान असल्याने या भागाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार पुढाकार घेत आहे. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासीमंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. 

प्रस्तावित प्रकल्प अंदाजित खर्च  
* मुंबई-बडोदा महामार्ग 20 हजार कोटी 
* वडपे ते ठाणे रस्ता 11 कोटी 
* जुना भिवंडी रस्ता 50 कोटी 
* शहापूर रस्ता 300 कोटी 
* नाशिक-सिन्नर रस्ता 12 कोटी

Web Title: mumbai news nitin gadkari