पर्वती मतदारसंघाच्या "ईव्हीएम'मध्ये छेडछाड नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

हैदराबाद न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल
मुंबई - तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यात पर्वती मतदारसंघात वापरण्यात आलेल्या दोन मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) छेडछाड करण्यात आली नव्हती, असा अहवाल हैदराबाद न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आला.

पुण्यातील पर्वती मतदारसंघातील दोन मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानयंत्रांची तपासणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेद्वारे करण्यात आली होती. येथील पराभूत उमेदवार अभय छाजेड यांनी केलेल्या याचिकेवर न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयास सादर करण्यात आला. या मतदान यंत्रांमध्ये छेडछाड किंवा अन्य प्रकारचा हस्तक्षेप झालेला नाही. त्यातील आकडेवारीही अबाधित आहे, असे अहवालामध्ये म्हटले आहे. तसेच संबंधित "ईव्हीएम' एकवेळ वापरणारी आणि प्रमाणित असून, अन्य संगणकांद्वारे नियंत्रित होणारी नाहीत, असेही स्पष्ट केले आहे. प्रभाग क्रमांक 185 आणि 242 येथील "ईव्हीएम' न्यायालयाने तपासणीसाठी पाठविली होती. याचिकेवर पुढील सुनावणी एका आठवड्यानंतर होणार आहे.

Web Title: mumbai news no problem to evm machine