कुंपण तोडून फुलवली नर्सरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

बेलापूर - नेरूळ जिमखान्यासमोरील सिडकोच्या भूखंडावर बेकायदा झोपड्या आणि फुलझाडांच्या नर्सरी आहेत. सिडकोने अनेकदा कारवाई केली असताना आणि काही महिन्यांपूर्वी कुंपण घातले असतानाही ते तोडून नर्सरी फुलवली आहे. त्यामुळे सिडकोने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

नवी मुंबई शहरात सिडकोचे अनेक राखीव भूखंड आहेत. परंतु त्याकडे सिडको दुर्लक्ष करीत असल्यामुळे तेथे बेकायदा झोपड्या, डेब्रिज आणि नर्सरी आहेत. येथील बेकायदा झोपड्या आणि नर्सरीवर सिडको कारवाई करते. परंतु काही दिवसांत पुन्हा तेथे नर्सरी आणि झोपड्या होतात. 

अनेक भूखंडांवर डेब्रिजचे ढिगारे आणि कचरा पडलेला आहे. तो हटवला जात नाही. त्यामुळे भूखंडांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नेरूळ सेक्‍टर- २८ येथील जिमखान्यासमोरील सिडकोच्या भूखंडांवर झोपड्या बांधल्या आहेत. फुलझाडांची नर्सरी सुरू केली आहे. या नर्सरीमध्ये शेकडो फुलांची आणि शोभेची रोपटे, कुंड्या, तुळशी वृंदावन, मडकी ठेवली आहेत. सिडकोने १६ मे २०१७ रोजी कारवाई करून नर्सरी आणि झोपड्या हटविल्या होत्या. परंतु त्यानंतर काही दिवसांत पुन्हा नर्सरी आणि झोपड्या बांधल्या होत्या. 

कायमस्वरूपी उपायांची गरज
अतिक्रमण रोखण्यासाठी सिडकोने या भूखंडाला तारेचे कुंपण घातले होते. कुंपण घाल्यावर सिडकोने या ठिकाणी दुर्लक्ष केल्याने तारेचे कुंपण तोडून भूखंडावर पुन्हा नर्सरी वसली आहे. सिडकोने या भूखंडावरील डेब्रिज हटवावे; तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

Web Title: mumbai news Nursery