Mumbai News : मनसेची टोपी आणि टी-शर्ट घालून जाणाऱ्या तरुणाला मॉलमध्ये जाण्यापासून रोखलं | Mumbai News oberoi mall mns worker stopped from entering into mall by wearing mns cap and t shirt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS
Mumbai News : मनसेची टोपी आणि टी-शर्ट घालून जाणाऱ्या तरुणाला मॉलमध्ये जाण्यापासून रोखलं

Mumbai News : मनसेची टोपी आणि टी-शर्ट घालून जाणाऱ्या तरुणाला मॉलमध्ये जाण्यापासून रोखलं

मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील एका मॉलमध्ये मनसेची टोपी आणि टी-शर्ट घालून जाणाऱ्या एका व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी अडवलं आहे. याप्रकरणी मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून मॉल प्रशासनाकडूनही मनसैनिकांची माफी मागण्यात आली आहे.

रविवारी १२ तारखेला दुपारी एक वाजता अक्षय चिंदरकर नावाचा मनसे कार्यकर्ता अंगात मनसेचे टी-शर्ट आणि डोक्यावर मनसेची टोपी घालून गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय मॉलमध्ये खरेदीसाठी गेला होता. मात्र तेथे प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाने त्या तरुणाला मनसेची टोपी डोक्यावरून काढण्यास जबरदस्ती केली.

शिवाय मॉलमध्ये फिरायचं असेल तर डोक्यावर टोपी किंवा अंगात मनसेचे टी-शर्ट घालून फिरता येणार नाही. मात्र चिंदरकर यांनी याबाबत सुरक्षारक्षकाला जाब विचारला.मात्र वरिष्ठांनी अशा आम्हाला सूचना दिल्या असल्याचं सांगत मॉलमध्ये प्रवेश नाकारला.

ही बाब चिंदरकर यांनी त्या भागातल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मॉलमध्ये जाण्यापासून का अडवण्यात आलं याचा जाब मॉल प्रशासनाला विचारल्यानंतर सुरक्षेची जबाबदारी असलेल्या टॉप सिक्युरिटी कडून माफी मागण्यात आली. यापुढे असला प्रकार होणार नाही याचे लेखी आश्वासनही देण्यात आले