धक्कादायक ! भाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा 'त्या' शब्दाने उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला कारवाईचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 28 January 2021

गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मात्र वेबसाईटवरील तो आक्षेपार्ह शब्द काढून त्यात बदल करण्यात आलाय.

मुंबई : भाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा अपमान करण्यात आला आहे. रक्षा खडसे यांच्या नावाखाली घृणास्पद आणि संतापजनक उल्लेख करण्यात आला आहे. भाजपच्याच वेबसाईटवर रक्षा खडसेंचा अपमान करण्यात आल्याने राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आक्रमक झालेत. यावर  भाजपनं कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल यावर कारवाई करेल करेल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. 

महत्त्वाची बातमी : तब्बल सहा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सयामी जुळ्या मुली अलग; दोघींची प्रकृती स्थिर

भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसेंबाबत नावापुढे संतापजनक आणि अपमानकारक उल्लेख करण्यात आला होता. या प्रकारानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाईचा इशारा दिला. भाजपनं दोषींवर तत्काळ कारवाई करावी असं गृहमंत्र्यांनी खडसावलं. भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसलाय. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपनं दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल, असा इशारा देशमुखांनी दिलाय.

महत्त्वाची बातमी : अतुल भातखळकर Vs आदित्य ठाकरे : उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठकीवरून भाजपचा ठाकरेंवर निशाण 

गृहमंत्र्यांच्या या इशाऱ्यानंतर मात्र वेबसाईटवरील तो आक्षेपार्ह शब्द काढून त्यात बदल करण्यात आलाय. आता यावर रक्षा खडसे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

( संपादन - सुमित बागुल )

mumbai news official website tags Raksha Khadse with derogatory words Anil Deshmukh slams BJP


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news official website tags Raksha Khadse with derogatory words Anil Deshmukh slams BJP