प्रस्तावित सरकारी नियमांना ओला-उबेर टॅक्‍सीचालकांचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

मुंबई - ऍपवर आधारित ओला आणि उबेर टॅक्‍सींना लागू करण्यात येणाऱ्या सरकारी नियमांना विरोध करणारी याचिका काही चालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

मुंबई - ऍपवर आधारित ओला आणि उबेर टॅक्‍सींना लागू करण्यात येणाऱ्या सरकारी नियमांना विरोध करणारी याचिका काही चालकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

सहा चालकांनी केलेल्या याचिकेचा उल्लेख मंगळवारी (ता. 6) मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे करण्यात आला. राष्ट्रीय परवाना असला तरी मुंबई शहरात व्यवसाय करता येणार नाही. त्यासाठी स्थानिक परवाना आवश्‍यक आहे, अशा प्रकारचा नियम या टॅक्‍सीचालकांसाठी करण्यात आला आहे. याविरोधात अली रझाक हुसेन आणि अन्य पाच जणांनी याचिका दाखल केली आहे. याचिकादारांनी राज्य सरकारसह ओला-उबेरमालक-चालक संघटनेलाही नोटीस द्यावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. याचिकेवर 14 ला सुनावणी घेण्याचे निश्‍चित करण्यात आले.

राष्ट्रीय परवाना असताना आम्हाला शहरात व्यवसाय करण्यास मनाई करण्याचा निर्णय आकसाने घेतला जात आहे, असा दावा याचिकादारांनी केला आहे.

या नियमांविरोधात ओला-उबेर कंपनीने याचिका का केली नाही, असा सवाल खंडपीठाने केला. रिक्षाचालकांना मुंबई शहरात प्रवेश न देण्याचा नियम असू शकतो तर ओला-उबेर टॅक्‍सीसाठीही असा नियम केला जाऊ शकतो, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

Web Title: mumbai news ola-uber taxidriver challenge to government rule