'वन अबोव्ह'च्या मालकांना 'पीएफ'प्रकरणी अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मुंबई - लोअर परेल येथील कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगप्रकरणी गजाआड असलेले "वन अबोव्ह' पबच्या तीन मालकांना पोलिसांनी गुरुवारी अन्य एका प्रकरणात अटक केली. कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) दहा लाख रुपये पगारातून कापूनही ती रक्कम त्या विभागाकडे जमा न केल्याप्रकरणी या तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांना ही अटक झाली.

या प्रकरणी भविष्य निर्वाह निधीचे निरीक्षक तुषार गुजराती यांनी तक्रार नोंदविली होती. त्यानुसार मेसर्स सिग्रीड ऑस्पिटॅलियाचे तिन्ही भागीदार क्रिपेश संघवी, जिगर संघवी व अभिजित मानकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त (मध्य प्रादेशिक परिमंडळ) जयकुमार दिली. सुमारे शंभर कर्मचाऱ्यांच्या "पीएफ'ची ही रक्कम असल्याचेही आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले. कमला मिल कंपाउंडमधील आगीप्रकरणी या तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बेकायदा बांधकामाबद्दलही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: mumbai news one above owner arrested