एक लाख कर्मचारी उतरणार रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

मुंबई - बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतील गोंधळ, गेल्या आठ महिन्यांपासून बंद पडलेली गटविमा योजना आदी मागण्यांसाठी पालिकेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी येत्या सोमवारी (ता. 26) आंदोलनाचा इशारा दिला आहे. पाणी खाते, आरोग्य या अत्यावश्‍यक सेवेतील सुमारे एक लाख कर्मचारी रस्त्यावर उतरणार असल्याने पालिकेच्या सेवा ठप्प होण्याची शक्‍यता आहे. महापालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात मोर्चाही काढण्यात येणार आहे.
Web Title: mumbai news one lakh municipal employee agitation biometric presenty