अमली पदार्थप्रकरणी पुण्यातील एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - 'म्याव, म्याव' या सांकेतिक भाषेत ओळखल्या जाणाऱ्या मेफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थप्रकरणी पुण्यातील व्यावसायिकाला मुंबईत अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली. हरिश्‍चंद्र नानासाहेब दोरगे (वय 51) असे आरोपीचे नाव असून, त्याच्या मोटारीतून एक कोटी 60 लाखांचे आठ किलो एमडी जप्त केले.

दोरगे पुण्यातील हडपसर येथील मगरपट्टा रोडवरील इम्मेमोरा पार्कमधील आलिशान इमारतीत राहतात. सायन-पनवेल मार्गावर एक व्यक्ती एमडी घेऊन येणार असल्याची माहिती एएनसीच्या आझाद मैदान कक्षाला मिळाली होती. त्यानुसार मानखुर्द जकात नाक्‍यावर पोलिसांनी मंगळवारी (ता. 23) सापळा रचला होता. खबऱ्याने दिलेल्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या संबंधित मोटारीला पोलिसांनी अडवले. त्यावेळी दोरगे याच्याकडे अमली पदार्थ सापडले. पोलिसांनी त्याला अटक केली. अमली पदार्थ कोठून आणले होते, याबाबत तपास सुरू आहे. यात मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पोलिस उपायुक्त (एएनसी) शिवदीप लांडे यांनी दोरगे याच्या अटकेला दुजोरा दिला.

Web Title: mumbai news one people arrested in drugs case