मेट्रोच्या स्थानकांवरही एका रुपयात उपचार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

मुंबई - मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एका रुपयात वैद्यकीय सेवा देणारे दवाखाने आता मेट्रोच्या स्थानकांतही दिसणार आहेत. 15 ऑगस्टपासून ही सुविधा सुरू होईल.

मुंबई - मध्य रेल्वेच्या स्थानकांवर एका रुपयात वैद्यकीय सेवा देणारे दवाखाने आता मेट्रोच्या स्थानकांतही दिसणार आहेत. 15 ऑगस्टपासून ही सुविधा सुरू होईल.

रुग्णांना कमी किमतीत औषधेही देण्याची सुविधा या "वन रुपी क्‍लिनिक'मध्ये असेल. मेट्रोच्या अंधेरी, घाटकोपर, साकीनाका, मरोळ नाका, डी. एन. नगर या स्थानकांवर हे दवाखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे वन रुपी क्‍लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी सांगितले. मेट्रोच्या पाच लाख प्रवाशांना ही सुविधा मिळेल.

Web Title: mumbai news one rupees treatment on metro station