दिवाळीत कांदा  दुप्पट महागला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

नवी मुंबई - दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एरवी 20 रुपयांना मिळणारा कांदा आता 40 रुपये किलो झाला आहे. घाऊक बाजारात कांदा 25 ते 27 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तो 40 रुपयांनी विकला जात आहे. आणखी काही दिवस कांद्याचे दर चढेच राहतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांना काही दिवस ही झळ सोसावी लागणार आहे. 

वाशीतील घाऊक कांदा-बटाटा बाजारात सध्या 100 ते 125 गाड्या कांदा दररोज येत आहे. मात्र पावसामुळे थेट किरकोळ बाजारात विक्रीसाठी जाणारा कांदा बंद झाला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे त्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांना नेहमी 20 रुपयांनी मिळणाऱ्या कांद्यासाठी 40 रुपये मोजावे लागत आहेत. दिवाळीनंतर पाऊस थांबल्यावर नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर त्याचे दर कमी होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: mumbai news onion