अकरावी ऑनलाईनसाठी अडीच लाख अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई - अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी उद्या (ता. 29) अंतिम मुदत असल्याने बुधवारपर्यंत दोन लाख 30 हजार 988 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. ऑनलाईनसाठी दोन दिवसांची मुदत वाढवून मिळाल्याने 30 जूनला अपेक्षित असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादीही पुढे ढकलली जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

नाव नोंदणीदरम्यान अनेकदा संकेतस्थळ हॅंग होत असल्याच्या तक्रारी पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडे केल्या होत्या. त्यामुळे आठवडाभरापूर्वी एक दिवस संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले होते. संकेतस्थळाची निर्मिती करणाऱ्या कंपनीने सततच्या हिट्‌समुळे संकेतस्थळ हॅंग होत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते; मात्र सर्व्हर दुरुस्तीनंतर ते सुरळीत झाले. विद्यार्थ्यांना नाव नोंदणीसाठी दोन दिवसांची मुदत वाढवून देत असल्याचे शिक्षण विभागाने मंगळवारी (ता. 27) जाहीर केले. बुधवारपर्यंत दोन लाख 30 हजार 988 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असली, तरी अद्याप एक हजार 267 विद्यार्थ्यांनी नोंदणी न केल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली. गुरुवारी (ता. 29) सायंकाळी 5 पर्यंत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: mumbai news online admission

टॅग्स