ब्रिटनमधील 53 नागरिकांना मुंबईतून ऑनलाइन गंडा 

अनिश पाटील
बुधवार, 21 जून 2017

मुंबई - ब्रिटनमधील 53 नागरिकांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती चोरून मुंबईतील ठकसेनाने 18 लाख 50 हजारांची ऑनलाइन खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी इम्रान जुमान चव्हाण (वय 29, विक्रोळी) याला अटक केली. 

इम्रान हा मालाड पश्‍चिम येथील एका सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीत सिनिअर कस्टमर केअर म्हणून काम करतो. ही कंपनी ब्रिटनमधील बार्कलेज्‌ कार्डधारकांना सेवा पुरवते. इम्रानने ब्रिटनमधील ग्राहकांनी केलेल्या दूरध्वनीवरून त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती घेतली आणि ऑनलाइन खरेदी केली. कंपनीला ग्राहकांकडून याबाबतच्या तक्रारी वाढू लागल्या. मुंबईतील सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडील ग्राहकांच्या क्रेडिट कार्डमधून ही खरेदी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या कंपनीने मालाडमधील कंपनीकडे या संदर्भात तक्रार केली. 

कंपनीने केलेल्या अंतर्गत तपासणीत इम्रानने ब्रिटनमधील 53 नागरिकांच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून 18 लाख 33 हजारांची ऑनलाइन खरेदी केल्याचे उघडकीस आले. मालाडमधील कंपनीचे सहायक व्यवस्थापक करण भोगल यांनी याप्रकरणी बांगूर नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी चव्हाणला अटक केली. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: mumbai news Online shopping crime

टॅग्स