करणी सेनेच्या 15 कार्यकर्त्यांना अटक 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 जानेवारी 2018

चेंबूर  - संजय लीला भन्साळींच्या "पद्मावत' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दिला असला, तरी या चित्रपटाला विरोध कायम आहे. त्यामुळे चेंबूर येथील के. स्टार मॉल येथे चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांनी चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, आरसीएफ, नेहरूनगर परिसरातून करणी सेनेच्या 15 कार्यकर्त्यांना अटक केली. या सर्वांना आज कुर्ला न्यायालयात हजर करून सिनेमा प्रदर्शित होत असताना कोणतेही वाईट कृत्य करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेतले आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुकत जे. डी. मोरे यांनी दिली.

Web Title: mumbai news padmavat movie Sanjay Leela Bhansali karni sena