पाम बीचवरील विजेचे खांब बदलणार

पाम बीचवरील विजेचे खांब बदलणार

बेलापूर - पाम बीच मार्गावरील १५ वर्षांच्या जुन्या विजेच्या खांबांची दुरवस्था झाली आहे. येथील ४३८ पैकी २२ खांब तुटले असून ४७ धोकादायक बनले आहेत. धावत्या वाहनांवर विजेचा खांब कोसळल्यास मोठ्या अपघाताची शक्‍यता होती. त्यामुळे हे खांब बदलण्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने आणला आहे.

सीबीडी बेलापूर ते वाशी हे अंतर कमी करण्यासाठी आणि सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी २००० मध्ये पाम बीच मार्ग तयार केला. वेळ आणि इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडीमुक्त रस्ता असल्याने नागरिकांनी या मार्गाला पसंती दिली. 

या मार्गावरून सीबीडी बेलापूर, सीवूड, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी व शहराच्या इतर भागांत आणि शहराबाहेर जाण्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याची डागडुजी पालिकेच्या वतीने केली जाते. रस्त्याची दुरुस्ती करताना पालिका प्रशासनाने बंद विजेचे दिवे दुरुस्त केले. जुन्या विजेच्या खांबांकडे दुर्लक्ष केल्याने ते धोकादायक बनले आहेत. गंजलेले हे खांब कोसळून अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सप्टेंबरच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाम बीच मार्गावरील विद्युत खांब बदलण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला आहे. या कामासाठी ७६ लाख ४६ हजार रुपये खर्च केला जाणार असून यामुळे पाम बीच मार्गावरील अंधारही दूर होणार आहे. नवी मुंबई महापालिकेकडे पाम बीच मार्ग हस्तांतरीत झाल्यापासून त्याची देखभाल व दुरुस्ती महापालिका करत आहे. परंतु येथील खाऱ्या वाऱ्यामुळे विजेचे खांब गंजले आहेत. त्यामुळे ते कमकुवत झाल्याने कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com