पाम बीच रोडवर खड्डेच खड्डे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

नवी मुंबई - नवी मुंबईतील ‘क्वीन नेकलेस’ समजल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गावर पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यावरील खडी उखडली आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आदळत असल्याने त्यांचा वेगही कमी झाला आहे.

वाशी-बेलापूर पाम बीच मार्गावर वेगाने वाहने धावतात. नवी मुंबईचे वैभव असलेल्या या मार्गाची चांगली देखभाल केली जाते. त्यामुळे वाहनचालकांच्याही तो आवडीचा बनला आहे. परंतु काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वाशीतून पाम बीच मार्गावर आल्यानंतर अरेंजा कॉर्नर आणि हावरे चौकादरम्यानच्या पुलाखाली चार-पाच मोठे खड्डे पडले आहेत. तेथून पुढे सानपाडा मोराज सर्कलच्या अगोदर रस्त्यावरील खडी उखडली आहे. सारसोळे सिग्नलजवळही खड्डे पडले आहेत. सीवूडस्‌कडे येताना सिग्नलजवळही खड्डे आहेत. अशीच परिस्थिती बेलापूरकडून वाशीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांचा वेग मंदावल्याने सायंकाळी पाम बीच मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

Web Title: mumbai news Palm Beach Road pothole