पाम बीच मार्गावर दिवसाही पथदिवे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

कोपरखैरणे - विजेची बचत हीच विजेची निर्मिती असा प्रचार एका बाजूला सुरू असताना नवी मुंबईत मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. येथे काही दिवसांपासून पाम बीच मार्गावरील पथदिवे दिवसाही सुरू असतात. त्यामुळे पालिकेलाच याचा विसर पडला आहे का, असा प्रश्‍न नागरिकांना पडतो. 

नवी मुंबईतील सर्वात चांगला रस्ता म्हणून पाम बीच मार्ग ओळखला जातो. वाशी ते किल्ला सिग्नल असा हा मार्ग नवी मुंबईची शान आहे. मात्र काही दिवसांपासून या मार्गावरील पथदिवे दिवसाही सुरू असतात. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे विजेची उधळपट्टी तर होत आहेच; शिवाय पालिकेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पाम बीच मोराज सर्कल परिसरात राहणारे अरविंद आचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकदा हे पथदिवे दिवसा १२-१ पर्यंत सुरू असतात. यामुळे विनाकारण पालिकेला जादा पैसे द्यावे लागत आहेत. याबाबत विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील लाड यांना विचारले असता याची माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: mumbai news Palm Beach Street light