बनावट पारपत्रप्रकरणी प्रवाशाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

मुंबई - बनावट पारपत्रप्रकरणी मदियन पंचमुथू या प्रवाशाला सहार पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने मदियनला शुक्रवारपर्यंत (ता. 8) पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिस मदियनची कसून चौकशी करत आहेत. 

मुंबई - बनावट पारपत्रप्रकरणी मदियन पंचमुथू या प्रवाशाला सहार पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने मदियनला शुक्रवारपर्यंत (ता. 8) पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिस मदियनची कसून चौकशी करत आहेत. 

मदियन हा मूळचा तमिळनाडूचा रहिवासी आहे. 2009 मध्ये तो टुरिस्ट व्हिसावर नोकरीकरता इंग्लंडला गेला होता. तेथील एका सुपर मार्केटमध्ये सहायक म्हणून काम करत होता. 2015 मध्ये त्याचे पारपत्र हरवले. त्याने याची माहिती भारतीय दूतावासाला कळवली. पारपत्र हरवल्यामुळे तो भारतात येऊ शकत नव्हता. तो काही दिवस इंग्लंडमध्ये बेकायदा राहत होता. त्याने एका एजंटच्या मदतीने पारपत्रावर स्केनगेन या देशाचे बनावट परमिटचे स्टिकर चिकटवले. मदियन भारतात येण्याकरता काही दिवसांपूर्वी विमानतळावर आला होता. इंग्लंडमधील विमानतळावरील अधिकाऱ्यांनी मदियनच्या पारपत्राची तपासणी केली. तेव्हा ते बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीनंतर त्याला भारतात पाठवण्यात आले. शनिवारी (ता. 3) मदियन सहार विमानतळावर आला असता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Web Title: mumbai news Passport crime