पेंग्विनमुळे उत्पन्नात वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) पेंग्विन आगमनानंतर उद्यानाच्या उत्पन्नात अवघ्या सहा महिन्यांत तब्बल १२ पटींनी वाढ झाली आहे. या कालावधीत सुमारे १२ लाख ३९ हजार २३१ पर्यटक आल्याची नोंद आहे. पूर्वी दररोज दहा ते बारा हजारांवर मिळणारे उत्पन्न आता शुल्कवाढीमुळे थेट लाखांवर गेले आहे. सहा महिन्यांत दोन कोटी ३३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

राणी बाग प्रवेश शुल्कवाढ गेल्या १ ऑगस्टपासून लागू झाली आहे. या शुल्कवाढीनंतर रोज दहा ते बारा हजारांवर मिळणारे उत्पन्न आता तब्बल लाखांवर गेले आहे. कोरियामध्ये पाहण्यास मिळणारे हंबोल्ट पेंग्विन जिजामाता उद्यानात २६ जुलै २०१६ रोजी दाखल झाले. त्यानंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

असे आहे शुल्क
राणीच्या बागेचे शुल्क याआधी दोन ते पाच रुपयांपर्यंत होते; मात्र १ ऑगस्टपासून चार व्यक्तींच्या कुटुंबाला १०० रुपये, तर एका व्यक्तीला ५० रुपये आकारले जात आहेत. परदेशी पर्यटकांना (१२ वर्षांवरील) ४०० रुपये, १२ वर्षांपर्यंत २०० रुपये आकारण्यात येते. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येत नाही.

Web Title: mumbai news Penguin