पंपांवरील शौचालये सर्वांसाठी खुली करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

मुंबई - पेट्रोल पंपांवरील शौचालये सर्वांसाठी खुली करण्याचे आणि पिण्याचे पाणीही मोफत देण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने पेट्रोल पंपमालकांना या सुविधा देण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पेट्रोल पंपांच्या आवारात महिला आणि पुरुषांना स्वतंत्र शौचालये आणि पिण्याचे पाणी देणे बंधनकारक आहे. पेट्रोल पंपांवरील शौचालये सार्वजनिक शौचालये म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. नवी मुंबई महापालिकेने पेट्रोल पंप व्यावसायिकांना पेट्रोल पंपाच्या दर्शनी भागात शौचालयाचा सूचना फलक लावण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. वाशी, एपीएमसी आणि तळोजा परिसरातील काही पेट्रोल पंपांवर तसे सूचना फलक लावण्यात आले आहेत. काही दिवसांत सर्व पेट्रोल पंपांना अशा नोटिसा पाठवल्या जातील, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे परवाना अधिकारी ए. के. शिंदे यांनी दिली.

Web Title: mumbai news petrol pump toilet open