मुंबई-पुणे महामार्गावर पेट्रोलच्या टँकरला आग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

रसायनी जवळच्या भोकरपाडा येथे सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. वाहतूक कोंडीमुळे पर्यायी मार्ग म्हणून जुन्या महामार्गावरची वाहतूक सावलामार्गे वळविण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडत असतात.

पनवेल : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील भोकरपाडा येथील हिरानंदानी फाँरच्युन सिटी येथे पेट्रोलच्या टँकरला आग लागल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. अडीच तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली.

रसायनी जवळच्या भोकरपाडा येथे सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. वाहतूक कोंडीमुळे पर्यायी मार्ग म्हणून जुन्या महामार्गावरची वाहतूक सावलामार्गे वळविण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडत असतात. जुना महामार्ग हा तुलनेत अरूंद असुन या मार्गावर अनेक धोकादायक वळणे असल्याने एखादा मोठा अपघात या मार्गावर घडल्यास वाहतुक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो.

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर आज सकाळी भोकरपाडा येथे एक पेट्रोलचा टँकर पलटी झाल्याने त्यातील पेट्रोल रस्त्याच्या कडेला सांडले.सांडलेले पेट्रोल पाण्यातुन  एक किलोमिटर पर्यंत वाहत गेले. काही अंतरावर चार ते पाच इसम प्रात:विधीसाठी बसले होते. त्यापैकी एकाने बिडी पेटवल्याने पेट्रोलने पेट घेतला. आग टँकरपर्यंत पोचल्याने टँकरनेही पेट घेतला. या घटनेमुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आल्या नंतर पोलीस व आय आर बी कर्मचार्यानी हा टँंकर बाजुला केला आहे मात्र या घटनेत टँकर जळून खाक झाली आहे.या घटणेत चौघे जण जखमी झाले असुन चौघाना उपचाराकरता कळंबोलीतील एमजीएम रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Mumbai news petrol tanker blast near Panvel