प्लास्टिकविरोधात गणेशोत्सव मंडळांचा जागर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मुंबई - ‘सकाळ’ माध्यम समूहाने सुरू केलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला शिवडी, धारावी, दादर, प्रभादेवी, चारकोप येथील गणेशोत्सव मंडळांचा पाठिंबा मिळत आहे. या मोहिमेत सहभागी होऊन मंडळे प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करत आहेत. शिवडीतील मंडळाने कागद, लाकडाचा वापर करून देखावा साकारला; तर धारावी, प्रभादेवी येथील मंडळांनी निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा भरवल्या आहेत. 

मुंबई - ‘सकाळ’ माध्यम समूहाने सुरू केलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला शिवडी, धारावी, दादर, प्रभादेवी, चारकोप येथील गणेशोत्सव मंडळांचा पाठिंबा मिळत आहे. या मोहिमेत सहभागी होऊन मंडळे प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करत आहेत. शिवडीतील मंडळाने कागद, लाकडाचा वापर करून देखावा साकारला; तर धारावी, प्रभादेवी येथील मंडळांनी निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा भरवल्या आहेत. 

टी. जे. रोडच्या राजाचा पर्यावरणपूरक देखावा
वडाळा  - शिवडीतील टी. जे. रोडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात ‘सेल्फी मजा की सजा’ हे तरुणांना पटवून देण्यासाठी आठ मिनिटांचा चलच्चित्र देखावा साकारला आहे. हा सेल्फी देखावा साकारताना त्यांनी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी’ या मोहिमेला पाठिंबा देत कागद, पुठ्ठे आणि लाकडी साहित्याचा वापर केला आहे. 

स्मार्ट फोनच्या स्पर्धेत तरुणाईच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सेल्फी. या सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांनी प्राण गमावले आहेत. हे तरुणांना समजावून सांगण्यासाठी शिवडीतील बाल-गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘सकाळ’च्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला पाठिंबा देत ‘सेल्फी मजा की सजा’ यावर आधारित पर्यावरणपूरक देखावा साकारला आहे. यासाठी मंडळाने कागद, पुठ्ठ्यांचा आणि लाकडाचा वापर करून समुद्रकिनारा, धबधबा, बोटीवर आणि वाहनावर चढून सेल्फी काढतानाची दृश्‍य तयार केली आहेत. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रमेश बोरचटे यांनी सांगितले. 

श्रींच्या राजाकडून भाविकांना कापडी पिशव्यांचे वाटप
दादर - सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे भाविकांचा कल असतो. परंतु मूर्ती जरी पर्यावरणपूरक असली, तरी देवाचे विसर्जन आपण का करायचे? या हेतूने लोअर परळ येथील त्रिशूळ इमारतीत राहणाऱ्या लोकरे कुटुंबीयांनी २००९ मध्ये फायबरची कायमस्वरूपी गणेशमूर्तीची स्थापन केली. ही मूर्ती वर्षभर काचेच्या पेटीत बंद असते व गणेशोत्सवात १० दिवस बाहेर काढली जाते. 

लोकरे कुटुंबातील श्री लोकरे यांनी ही खास मूर्ती बनवून घेतली आहे. ‘श्रींचा राजा’ अशी ओळख असलेल्या या गणपतीसाठी यंदा गज-गरुड महालाची प्रतिकृती साकारली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे प्रदूषण टाळता यावे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येत नाही. लालबागच्या राजाची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी श्री यांनी या मूर्तीची स्थापना केली आहे. 

‘सकाळ’च्या प्लास्टिकमुक्त मोहिमेचे कौतुक वाटत आहे. त्यामुळेच या मोहिमेला पाठिंबा देत या वर्षी दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना कापडी पिशव्यांचे वाटप करत आहोत. सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अशी मोहीम राबवली तर मुंबई प्लास्टिकमुक्त होईल.
- श्री लोकरे, गणेशभक्त.

Web Title: mumbai news plastic ganesh mandal