प्लास्टिक प्रदूषण घटवा... पर्यावरण वाचवा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

मुंबादेवी - पर्यावरणास घातक अशा प्लास्टिकपासून आपल्या मुलाबाळांना दूर ठेवा. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते अत्यंत घातक आहे. पुढची पिढी प्लास्टिकपासून वाचवायची असेल तर प्लास्टिकमुक्तीसाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन अभिनेत्री जुही चावला हिने केले. ‘सकाळ’च्या प्लास्टिकविरोधी मोहिमेची तिने मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि त्याला पाठिंबा जाहीर केला.

‘कौन्सिल फॉर फेअर बिझिनेस प्रॅक्‍टिस’तर्फे ‘पर्यावरण वाचवा, प्लास्टिकचा वापर कमी करा आणि प्लास्टिकचे प्रदूषण घटवा,’ अशी साद मुंबईकरांना घालण्यात आली. त्यासाठी झालेल्या विशेष कार्यक्रमात जुही चावला आणि महापालिकेच्या ए प्रभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी प्लास्टिकचे धोके समजावून सांगितले. कौन्सिलच्या अध्यक्षा कल्पना मुन्शी तसेच शेल्ली गुप्ता, डॉली ठाकूर, रोटरी क्‍लबचे राजन देसाई, किरण मेहता, कुंती ओझा आदी मान्यवर कार्यक्रमाला हजर होते.

महापालिकेचे १३ हजार सफाई कामगार रोज मरीन ड्राईव्ह आणि जुहू बीचसह विविध समुद्रकिनाऱ्यांवर व शहरातही कचरा गोळा करतात. त्यात प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणावर असतो. प्रत्येक दिवशी हजारो टन प्लास्टिक कचरा गोळा होतो. आपल्याकडे नागरीकरण आणि लोकसंख्यावाढ मोठ्या प्रमाणावर असल्याने कचरा कमी न होता वाढत चालला आहे. सध्या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया वा फेरवापर होत नसल्याने डंपिंग ग्राऊंडवर घाणीचे डोंगर वाढत चालले आहेत. प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे समस्याही वाढत आहे, असे दिघावकर यांनी दाखवून दिले. 

प्लास्टिकचा भस्मासुर नाहीसा करण्यासाठी ‘सकाळ’ने हाती घेतलेल्या प्लास्टिकमुक्ती मोहिमेचे जुहीने स्वागत केले. ‘सकाळ’च्या यापूर्वीच्या प्लास्टिकविरोधी मोहिमेत मी सक्रिय सहभाग घेतला होता. निसर्ग, प्राणी-पक्षी आणि आपल्या मुलांसाठी प्लास्टिक हानिकारक आहे. 

आताही गणेशोत्सव काळात ‘सकाळ’ने सुरू केलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला मी नक्कीच हातभार लावेन. मोहिमेचे मी स्वागत करते. महत्त्वाच्या अशा मोहिमेस मी मनापासून पाठिंबा देते, असे ती म्हणाली.

Web Title: mumbai news plastic Juhi Chawla