प्लॅस्टिकमुळे कोळंबीची वाढ खुंटली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई - समुद्रातील वाढत्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्री जिवांचा नाहक बळी जात असल्याचे व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर व्हायरल होत असताना प्लॅस्टिकमुळे कोळंबीची वाढ खुंटत आहे, असा दावा ज्येष्ठ सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. विनय देशमुख यांनी "सकाळ'शी बोलताना केला.

सागरी उत्पादनात जगभरात भारताची कोळंबीच्या निर्यातीवर मक्तेदारी समजली जाते. मात्र, काही वर्षांत कोळंबीच्या निर्यातीत प्रचंड घट झाली आहे. समुद्रातील प्लॅस्टिकचे वाढते जाळे व्हेल माशांना घातक ठरत असल्याची ओरड पूर्वीपासूनच होत आहे. मात्र, प्लॅस्टिकमुळे भारतीय सागरी पट्ट्यातील कोळंबीच्या उत्पादनालाही फटका बसत असल्याची भीती व्यक्त होत आहे. ज्येष्ठ सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. देशमुख यांनी कोळंबीवर विशेष अभ्यास केला आहे.

Web Title: mumbai news plastic shrimp