सिडकोच्या भूखंडांना कुंपण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

बेलापूर - सेक्‍टर २८ नेरूळ जिमखान्यासमोरील सिडकोच्या भूखंडांवर शोभेची झाडे आणि फुलझाडांच्या बेकायदा नर्सरी आणि झोपडपट्टी आहे. तेथे अनेकदा कारवाई करूनही अतिक्रण होत असल्याने ते रोखण्यासाठी सिडकोने आता या भूखंडांना कुंपण घालण्याचे काम हाती घेतले आहे. याबाबत ‘सकाळ’ने बातमी दिली होती. त्याची दखल घेऊन सिडकोने सीवूड्‌स रेल्वेस्थानकाशेजारच्या भूखंडाभोवती संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेतले आहे.

बेलापूर - सेक्‍टर २८ नेरूळ जिमखान्यासमोरील सिडकोच्या भूखंडांवर शोभेची झाडे आणि फुलझाडांच्या बेकायदा नर्सरी आणि झोपडपट्टी आहे. तेथे अनेकदा कारवाई करूनही अतिक्रण होत असल्याने ते रोखण्यासाठी सिडकोने आता या भूखंडांना कुंपण घालण्याचे काम हाती घेतले आहे. याबाबत ‘सकाळ’ने बातमी दिली होती. त्याची दखल घेऊन सिडकोने सीवूड्‌स रेल्वेस्थानकाशेजारच्या भूखंडाभोवती संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेतले आहे.

नवी मुंबईतील नागरिकांना सामाजिक सुविधा देण्यासाठी आरक्षित ठेवलेले सिडकोचे अनेक भूखंड नेरूळ आणी सीवूड्‌समध्ये आहेत. यातील अनेक भूखंड पालिकेकडे हस्तांतरित झालेले नाहीत. त्यामुळे मोक्‍यावरच्या ठिकाणच्या या पडीक भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर डेब्रिज आणि कचरा टाकलेला आहे. येथील अनेक भूखंड बेकायदा नर्सरीने व्यापले होते. काही ठिकाणी बेकायदा झोपड्या झाल्या होत्या. त्यामुळे हा परिसर बकाल झाला आहे. सिडकोच्या अतिक्रमणविरोधी विभागाकडून वारंवार कारवाई केली जात होती; परंतु रात्री टाकल्या जाणाऱ्या डेब्रिजचे या भूखंडांवर डोंगर तयार झाले होते. ते हटवण्याची मागणी नगरसेविका सपना गावडे यांनी सिडकोकडे केली होती; परंतु सिडकोने लक्ष न दिल्याने त्यांनी स्वखर्चाने डेब्रिज हटवले होते. या भूखंडाला संरक्षक कुंपण नसल्याने तेथे पुन्हा डेब्रिजचे डोंगर तयार झाले होते. नगरसेविका गावडे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. या भूखंडावरील डेब्रिज आणि अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षक कुंपण घालावे, अशी मागणी त्यांनी केली होती. याबाबतची बातमी २२ मे आणि ५ ऑगस्टला ‘सकाळ’ने दिली होती. शेवटी त्याची दखल घेऊन सिडकोने येथे संरक्षक भिंत बांधण्याचे काम हाती घेतले आहे.

सिडकोच्या भूखंडावरील अतिक्रमणांवर नेहमी कारवाई केली जाते. काही भूखंडांना संरक्षक कुंपण घातले आहे. नेरूळ जिमखाना येथील भूखंडावर झोपडपट्टी, डेब्रिज आणि नर्सरीचे अतिक्रमण होत असल्याच्या बातम्या ‘सकाळ’ने दिल्या होत्या. हे प्रकार रोखण्यासाठी भूखंडाला कुंपण घालण्याची सूचना केली होती. त्यानुसार संरक्षक कुंपणाचे काम सुरू केले आहे. 
- डॉ. मोहन निनावे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको
 
प्रभागातील भूखंडावर मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. येथील डेब्रिज उचलण्यासाठी सिडकोकडे मागणी केली होती; परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे स्वखर्चाने ते उचलले होते. त्यानंतर पुन्हा तेथे डेब्रिज जमा झाले. ‘सकाळ’नेही याबाबत बातम्या देऊन पाठपुरावा केला. त्यामुळे तेथे कुंपण घालण्याचे काम सिडकोने सुरू केले आहे. 
- ॲड्‌. सपना गावडे, नगरसेविका

Web Title: mumbai news plots of CIDCO